लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय येथे पदवी वितरण समारंभ संपन्न*
July 20, 2021
स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथे दिनांक 20 जुलै 2021 रोजी पदवी वितरण समारंभ संपन्न झाला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटी यवतमाळचे अध्यक्ष सन्माननीय श्री दिवाकरराव पांडे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून एज्युकेशन सोसायटी यवतमाळचे सचिव माननीय चंद्रकांत जी रानडे लाभले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री प्रदिप घुले उपसंचालक , तंत्रशिक्षण विभाग वर्धा हे लाभले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुंटे या समारंभास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुंटे यांचा महाविद्यालयाच्या वतीने माननीय श्री दिवाकर राव पांडे यांनी अमरावती विद्यापीठाच्या सिनेट मेंबर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला.
या पदवी वितरण समारंभा मध्ये बीए ,बीकॉम, एम ए संगीत आणि गृह अर्थशास्त्र या विषयांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रदान करून सन्मान करण्यात आला.
तसेच पीएचडी कोर्सवर्क पूर्ण करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .
या समारंभाच्या प्रास्ताविकपर भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुंटे यांनी विद्यार्थ्यांना भविष्य बद्दल शुभेच्छा दिल्या.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर संदेशातून येत्या काळामध्ये शैक्षणिक ज्ञानाबरोबरच कौशल्य विकासा बद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असा संदेश दिला.
प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री प्रदिप घुले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्व आयुष्यातील उदाहरणे दिली व कशाप्रकारे आपण अपयश मिळाल्यानंतर सुध्दा यश मिळवु शकतो याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले.
तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय दिवाकरराव पांडे सर यांनी सर्व विद्यार्थिनींना व संशोधक विद्यार्थ्यांना भविष्याबद्दल शुभेच्छा दिल्या आपले समाजाप्रती,
राष्ट्रापती जे दायित्व आहे ते प्रत्येक विद्यार्थ्याने जाणून त्या हिशोबाने प्रयत्न केले पाहिजे व राष्ट्र निर्मितीमध्ये आपले योगदान दिले पाहिजे.
या समारंभाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्वाला नागले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. चंद्रशेखर कुडमेथे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डॉ. ममता दयने प्रा. मोनाली सलामे डॉ. सरिता देशमुख प्रा. सौरभ वगारे प्रा. रवी गिरी तसेच नितीन वालदे, प्रीती तिवाडे व वैभव चौधरी यांनी परिश्रम घेतले.

स्थानिक लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय यवतमाळ येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुंटे अध्यक्षस्थानी लाभले आपल्या अध्यक्ष पर भाषणातून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांचे विचार व कार्य कशा पद्धतीने आजही विद्यार्थ्यां ना प्रेरणा देतात यावर मार्गदर्शन केले आज कोरोना व संचार बंदी च्या काळामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे
किमान एक पुस्तक तरी वाचावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजश्री धर्माधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सौरभ
वगारे यांनी केले कार्यक्रमांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री नितीन वालदे व प्रीती तिमांडे यांनी प्रयत्न केले.